जगासमोर कोरोना सारख्या महामारीच संकट उभं असताना अनेक देशांना लॉकडाऊन ला सामोरे जाणे भाग पडले आहे.,परिस्थितीही तशीच निर्माण झाली आहे आपल्याकडेही शासनाने २१ दिवसाचे लॉकडाऊन घोषित केले असताना आज जवळपास आठवडाभरानंतर घरात राहून अनेक लोकांनी भरपूर कामे केली पुस्तके वाचून झाली.घरात साफसफाई करून झाली, दूरदर्शन सारख्या राष्ट्रीय वाहिणीवरील रामायण ,महाभारत आणि शक्तिमान सारख्या मालिका सुरू करून आपापले मनोरंजन करून घेण्याचा प्रयत्न केला जाऊ लागला आहे ज्याच्या माध्यमातुन वेळ घालवता येईल.
ही झाली सर्वसाधारण प्रौढांची परिस्थिती पण तरुण वर्गात या बऱ्याच गोष्टीकडे दुर्लक्ष केलं जातंय आणि यामुळे त्यांच्यापुढे या काळातील आपला वेळ घालवण्यासाठी एक उत्तम मार्ग आहे तो म्हणजे मोबाईल होय.मोबाईल च्या माध्यमातून फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम,व्हाट्सअप्प सारख्या बऱ्याच समाजमाध्यमांचा वापर तरुणांकडून केला जातोय.
याचाच एक भाग म्हणून मागच्या २-४ दिवसापासून फेसबुक वर आपल्या व आपल्या मित्र परिवाराच्या जुन्या फोटो पाठवण्याचा जणू नवीन ट्रेंडच आला आहे; हे प्रकरण फोटो फक्त शेअर करून थांबत नाही तर याफोटोवर काही लोकांनी गमतीशीर कंमेंट्स देने सुरू केले पण सुरुवातीला काही लोकांपर्यंत मर्यादित असलेला हा भाग आज इतका पसरलाय की फेसबुक उघडलं की अनेक जणांचे जुने फोटो आणि त्याखाली गमतीशीर कंमेंट्स पाहायला भेटत आहेत. यामूळे काहीजण बरेच नाराज होत असताना दिसत आहेत., अगदी त्रासून "कृपया कंमेंट्स करू नका हवेतर लॉकडाऊन संपल्यास पार्टी देतो".अशीही ग्वाही देत आहेत.काही जण याला विनोदाचा भाग म्हनून ह्या सगळ्या कंमेंट्स चा आनंद घेत असताना दिसून येत आहेत तेवढाच विरंगुळा पण यामुळे कोणाच्या भावना दुखावणार नाही याचाही विचार याठिकाणी होणं अपेक्षित आहे.आणि जे लोक यामुळे नाराज झालेत त्यांनी मात्र यावर नाराजी न होता मनमुरादपणे या गोष्टींचा आनंद घ्यावा कारण
#बात उन्हीं की होती है,
जिनमें कोई #बात होती है !
0 Comments