Although it is a necessity to use mobile today, we also need to understand how much to use it .  We are so busy with mobile that we are forgetting the values of our people around us. And even though it is easy to feel like mobile is a very important thing, we are overusing it and that too for unnecessary things.
 Today, whether family or friends spending more time on mobile than when we are with each other, we do not even know how far we are from each other even though we are with each other. That is family conflict. This is the family situation, but the two people are husband and wife  I do not feel the need to tell them what this mobile has done to them. We are all conscious and knowledgeable. We are expected to think about all these things. Are we going away because of mobile? Are we facing new controversies? Are you interrupting you and your spouse's communication ? and numerous such questions ........
 Now you say that the person who cured it or the person who presented the problem should answer the same. But he who understands why his problems are causing them, and it is his responsibility to remove them and create a trusting and cordial environment among the family and the couple. if you are trying to do so, you are not dealing with yourself  What are they honest?  The same idea is expected of you for yourself and for your family peace.

This article is for all of us and we should really think about it.

 If you want to suggest some corrections, welcome them all.

आजच्या काळात मोबाईल वापरणं ही गरज झाली असली तरी त्याचा वापर कितपत करावा हेही आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. मोबाईलमुळे आपण इतके बिझी झालेलो आहोत की आपणास आपल्या आजूबाजूला असलेल्या आपल्या हक्काच्या नात्यांचाही विसर पडत चाललाय की काय असे वाटत आहे.आणि असे वाटणे सहजीकही आहे मोबाईल ही एक अत्यंत आवश्यक वस्तू असली तरी तीचा अतिवापर आपण करतोय आणि तेही अनावश्यक गोष्टींसाठी, होणं??
आज कुटुंब असो की मित्र आपण एकमेकांसोबत असताना एकमेकांना सुखदुःख सांगण्यापेक्षा जास्त मोबाईलवर जास्त वेळ घालतो आपण सोबत असूनही एकमेंपासून किती दूर राहतोय हे आपल्या लक्षातच येत नाही.आपण ज्याला आपली अशी नाती म्हणतोय ती नाती आपली फक्त सोबत राहण्यापुरती उरली आहेत की काय असे वाटते.याचे कारण म्हणजे कुटुंबात होणारा विसंवाद होय.ही झाली कौटुंबिक परिस्थिती पण जे दोन लोक नवरा आणि बायको म्हणवतात अशांची परिस्थिती या मोबाईलने काय केली आहे हे वेगळे सांगण्याची गरज मला इथं वाटत नाही.आपण सर्वश्रुत आणि जाणकार आहेत आपण या सगळ्या बाबींचा विचार करणे अपेक्षित आहे ., मोबाईलमुळे आपण दूर जातोय का ??आपण नवीन वादविवादाना तोंड फोडतोय का??नातेसंबंधामधील दुधात आपण मिठाचा खडा तरी टाकण्याचं काम करत नाही आहोत न ??? आपण आपल्या आणि आपल्या जोडीदाराच्या संवादात एक अडथळा आणतोय का ???????आणि असे असंख्य प्रश्न.............
आता तुम्ही म्हणाल की याला इलाज काय किंवा समस्या ज्याने मांडली त्यानेच याच उत्तर द्यावे.पण मित्रहो आपल्या समस्या कशामुळे निर्माण होत आहेत हे ज्याचं त्यालाच समजतं आणि त्या दूर करून कुटुंब आणि जोड्यांमध्ये एक विश्वासपूर्ण आणि सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी ही आपली आहे आपण यापासून दूर पळू शकत नाही आणि असा जर आपण प्रयत्न करत असाल तर आपण आपापल्या स्वतःशी आपल्या नात्यांशी इमानदार आहोत काय ? याचाही विचार आपल्या स्वतःसाठी स्वतःकडून स्वतःसाठी आणि आपल्या कौटुंबिक शान्ततेसाठी करण अपेक्षित आहे.


हा लेख आपल्या सर्वांच्या अंतर्मनासाठी आहे आपण त्याचा सर्वांनी खरेच त्याचा विचार करावा.

यात काही दुरुस्त्या सुचवाव्या वाटल्या तर त्या सर्वांचे स्वागत.........