संसाराचा गाडा दोन चाकावर चालतो अगदी एका रेषेत आणि एक लयीत जर तो चालला तर नक्कीच कसलीच अडचण येणार नाही .......
अस म्हणतात की लग्नगाठ वरून बांधली जाते , तुम्हीं म्हणाल म्हणजे काय काहीही बांधलं जाइल का ??याच उत्तर नक्कीच सांगता येत नाही ;पण व्यक्ती तितक्या प्रवृत्ती म्हणीसारखं सगळ्यांचे स्वभाव गुणधर्म एकमेकांशी जुळतील असंही म्हणता येत नाही; पण याला जर समजूतदारपणाची किनार दिली तर हो नक्कीच ते स्वभाव जुळतात आणि सगळ्या गोष्टी सुलभ होतील.
सगळ्या गोष्टी आपल्याला सहज आणि मनासारख्या भेटायला आपण देवही नाहीत ;त्यामुळे माणूस म्हणून जगताना एकमेकांची जीवनभर साथ देणाऱ्या साथीदाराला आपण दुखावणार नाही आणि आपण त्याचा मान सन्मान कोमेजेल असेही कृत्य करु नये.
एकमेकांना आपण अर्पण केलेल आयुष्य आणि त्यातला अर्पण भाव यात कधीच अहंकार आडवा येता कामा नये एकवेळ आपण स्वतःला स्वतःच्या मनाला मारून ठेवावं पण आल्यामुळे आपला साथीदार दुखावला जाईल असं कोणतही कृत्य आपण करणं टाळणे आवश्यक आहे.
रागाच्या भरात आपण काय बोलून जातो हे आपल्याला कळत नाही पण राग येऊ द्यावाच का ?हाही प्रश्न महत्वाचा आहे .
आपल्या मनावर आपला ताबा असेल आणि आपण योग्य आणि अयोग्य गोष्टीतला फरक नीट समजू शकलो तर रागच येणार नाही.
राग येणाऱ्या व्यक्तींनी आपण काय करतोय व याचे परिणाम काय होऊ शकतात याचा विचार मनात पक्का ठेवला तर आपण रागापासून शेकडो मेल दूर राहू शकूत.
अहंभाव म्हणजे नेमकं काय हे समजायला हवं त्यात बऱ्याच गोष्टींचं उत्तर लपलेलं आहे यासाठी एकच करा मी, माझा, माझी अमुक अमुक या यापेक्षा आम्ही आमचा आपला आपण हे शब्द लक्षात ठेवले तर सगळ्या निराशाजनक बाबींना किनार देता येईल
मला माहित नाही वरच्या ह्या सर्व गोष्टी कितीजणांना तंतोतंत पाळणे शक्य होईल पण वाचनांती आपण या सर्व बाबींवर 5 मिनिटे डोळे मिटून चिंतन केले तर याचा खरा अर्थ नक्कीच उमगू शकेल.,पण हो हेही खर आहे की शांत चित्ताने विचार करताना तो प्रामाणिकपणे होणे जरुरीचे आहे कारण जेव्हा तुम्हीं विचारांशी आणि स्वतःशी प्रामाणिक राहाल तेव्हा नक्कीच आपल्या मध्ये असलेल्या चूका शोधन्याची त्या चुकांना सुधारण्याची आणि त्यात बदल घडऊन आणण्याची सद्बुद्धी नक्कीच प्रत्येकाला प्राप्त होईल.
0 Comments