मागील काही महिन्यांपासून जग कोरोनाच्या प्रभावाखाली जगत असताना जगातली वेगवेगळे देश यापरिस्थितीचा सामना करण्यासाठी झगडत आहेत. यासाठी लस निर्मितीसाठी अनेक देशांचे प्रयत्नही सुरू आहेत पण सध्यपरिस्थितीत एवढ्या लवकर लस निर्मिती चाचण्यांना लागणाऱ्या कालावधीमुळे ते शक्य नसल्याचे दिसून येते.मुळात हा रोग आला कोठून? यावर संपूर्ण जगाने प्रश्न उपस्थित केले , या प्रश्नाच्या उत्तराचा विचार करता बऱ्याच बाबी ह्या चीन भोवती फिरताना दिसून येतात.अमेरिकेने चीन मधील ऊहान शहरातून हा जंतू पसरला असल्याचे सांगितले त्यासाठी जागतिक आरोग्य संगठणेवर चीनच्या चौकशीसाठी वारंवार मागणी करण्यात येत आहे.
सध्यपरिस्थितीत चीन विरोधात अनेक देशांनी आपले आक्षेप नोंदवलेले आहेत याबाबत साठपेक्षा जास्त देशांनी जागतिक आरोग्य संगठनेकडे चीनच्या चौकशीची मागणी लावून धरली आहे.चीन सध्या अनेक आर्थिक संकटाला सामोरे जात असताना चीनमधील अनेक उद्योग स्थलांतरणाच्या मार्गावर असल्याने चीनची डोकेदुखी नक्कीच वाढली आहे. जागतिक रोषाला सामोरे जाणार चीन देशांतर्गत जनतेच्या रोषालाही सामोरे जाताना दिसून येतोय.यापरिस्थितीत चीनला यासगळ्यातून जनतेचे व पर्यायाने जगाचे या विषयावरून लक्ष विचलित करण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न सुरू केलेआहेत.या प्रयत्नांचाच एक भाग म्हणजे चीनने दक्षिण महासागर आणि भारत-चीन सीमेवरील लडाख भागात लष्कराची वाढवलेली कुमक होय.
भारत हा आशिया खंडातील विकसनशील देश म्हनून समोर येत आहे त्याबरोबरच चीनला महासत्ता बनण्याच्या वाटेमध्ये असलेला अडथळा दिसून येत आहे.तसेच कोरोनाकाळात ज्या कंपन्या चीनमधून बाहेर पडतील त्यांना भारत हे गुंतवणुकीसाठीचे उत्तम स्थान दिसत असताना चीनची पोटदुखी होणे साहजिक आहे.
अलीकडील काळात चीनच्या हालचालीकडे पाहता चीन नेमकी कशाची तयारी करतोय हे सांगण्याची गरज वाटत नाही.चीन आपल्या लष्कराची कुमक भारतीय सीमेवर वाढवत आहे त्याप्रमाणेच दक्षिण समुद्रातही युद्धनौका चीनने उतरवून तैवान सारख्या देशावर वचक निर्माण करण्याचा प्रयत्न दाखवुन दिला आहे.याबाबतीत चीनने भारतीय सीमेपासून दोनशे किलोमीटर दूर पंगँग सरोवर परिसरात नवीन बांधकाम सुरू केले आहे तसेच जगातील सर्वात उंच स्थानावर असलेल्या तिबेटमधील नगरी गुन्सा विमानतळावर नवीन धावपट्टी बांधण्याचेही काम युद्धपातळीवर हातात घेतले आहे.
यापरिस्थितीत कोणतेही कारण नसताना युद्ध
होणे म्हणजे चीन जगासमोर व चीनमधील जनतेचे कोरोनावरील लक्ष विचलित करून एकप्रकारे अस्तित्वाची लढाई लढताना दिसून येत आहे.
चीनने आपल्या अस्तित्वाची लढाईसाठी इतरांचे अधिकार पायदळी तुडवण्याचे काम चालवले आहे.यासाठी सीमेवर लष्कर जमा करून दबाव आणायचा प्रयत्न चीनकडून चालवला जात आहे.पण आजचा भारत या दबावाला कसलीही भीक घालणारा नाही हेही चीनच्या लक्षात असणे आवश्यक आहे.,सार्वभौमत्वाच्या संरक्षणाच्या नावाखाली चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी चालवलेले हे दबावतंत्र बळी पडण्याजोगे नक्कीच नाही कारण 1962 च्या भारत-चीन युद्धवेळी भारताची जी परिस्थिती होती त्या आणि आजच्या परिस्थिती मध्ये कमालीची सुधारणा आहे भलेही चीनकडे अत्याधुनिक सैन्यासामग्री असली तरी त्याच्या तुलनेत भारतानेही नक्कीच सैन्यासामग्री बाबत नक्कीच सुधारणा केलेली आहे. त्यामुळे चीनकडून भारतावर लादले जाऊ शकणाऱ्या युद्धाला भारत उत्तर देण्यासाठी नक्कीच तयार आहे यात कसलीच शंका नाही.
दोन्ही देश युद्धासाठी तयार असले तरी आजच्या परिस्थितीत युद्ध हा नक्कीच पर्याय होऊ शकत नाही कारण दोन्ही देश कोरोनामुळे आर्थिक परिस्थितीत म्हणावे तितके मजबूत नाहीत.,शिवाय दोन्ही देशांना सध्या असलेल्या कोरोनापीडित परिस्थीतीवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे., त्यामुळे सध्यपरिस्थितीत डोकलाम मुद्द्याप्रमाणे हा मुद्दा बसून दोन्ही देशांना चर्चेअंती सोडवणे अपेक्षित आहे.जेणेकरून आशिया खंडातील शांती भंग होणार नाही.