जीवनात मुळात जबाबदाऱ्या नव्हत्याच माझ्यावर कधी,पण उगीच वाटायचं की माझ्यावर खूप जबाबदाऱ्या आहेत आणि आपण जबाबदारीनं वागायचं,कधी तोल ढळू द्यायचा नाही,आणि कधी कोणाचं बोट आपल्याकडे वळू द्यायचं नाही;आणि तसा वागण्याचा पुरेपूर प्रयत्नही केला.वाटलं जबाबदाऱ्या पुरेपूर निभावण्यात यशस्वी आहोत आपण पण प्रश्न पडला अरे बाबा माझ्यातला 'मी'पणाच काय? तो अजून शिल्लक आहेच की,स्वतःकडे लक्ष द्यायला विसरून गेलो की राव! हे ह्या सरत्या वर्षात प्रकर्षाने जाणवलं,या बरोबरच हेही लक्षात आलं की जबाबदाऱ्या तर जीवनाचा भागच आहेत की, कितीही नाही म्हणालो तरी निभवाव्या लागणारच आहेत त्या;पण माझ्यातला 'मी'सुद्धा जगणं आवश्यक आहे.मागील काही वर्षात मुळात मी माझ्यासाठी किती जगलो हे आठवण्याचा प्रयत्न केला तर खूप कमी क्षण असे आठवले की हो मी एवढंच स्वतःचा विचार केलाय. कधी कुटुंब ,कधी मित्र, कधी नोकरी तर कधी सहकार्यांसाठी जगलोय.पण माझं म्हणावं अस काय? मुळात एवढा मोठा प्रश्न आता मला नेमका का पडावा? याचा विचार करून हसू आलं माझंच, आणि स्वतःलाच विचारलं अरे बावळ्या तुला हे आत्ताच का आठवतंय.खूप प्रयत्न केला की,का?पण नाही मिळालं राव उत्तर,शोधतोय अजूनही...........................
पण हो आज हे संपणारं वर्ष आणि वर्षाचा शेवटचा दिवस याला एवढंच वादा आणि एक पक्का इरादा उद्यापासून जरा जास्तीचा वेळ माझ्यातल्या 'मी' पणासाठी द्यायचा, मनाप्रमाणे मोकळं जगण्याचा किमान प्रयत्न तरी करायचा. हे मात्र पक्क😊
असो सर्वाना येणाऱ्या नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
1 Comments
Khup sunder
ReplyDelete