मुले देवाघरची फुले
आशा ओळी कोणीतरी लिहलेल्या आहेत आणि त्या खऱ्या अर्थाने तशा छानही वाटतात प्रत्येकघरामधील लहान मूल म्हणजे घरातील प्रसन्न वातावरण वातावरणच असण्याचं कारण होय.
आजकालच्या धकाधकीच्या जीवनात घरातील मोठ्या व्यक्तींना एकमेकांशी बोलायला वेळ मिळतोच असे नाही. आणि वेळ मिळूनही आपण एकमेकांशी मनमोकळे पणाने बोलतोय असे नाही पण घरात लहान मुले असली की त्यांच्या वेगवेगळ्या बाललीला मुळे घरातील वातावरण सतत प्रसन्न राहते;याचा अर्थ असा नाही की घरातील लहान मुलांच्या सगळ्या बाबी आपण बाललीला म्हणुन पाहुत!किंवा हसण्यावरी नेऊत.,आपल्या घरातील लहान मुलांवर चांगले संस्कार व्हावेत,ते सर्वांशी चांगले वागावेत,त्यांनी मोठयांचा आदर करावा आणि प्रसंगी ते चुकलेच तर त्यांना त्यांच्या चूका लक्षात याव्यात यासाठी त्यांना वेळोवेळी समजावणं,रागावणं,काही काळ त्यांच्याशी अबोला धरणं आणि गरज पडलीच तर हाथ उचलन आवश्यक असतं पण याउलट आपण त्यांच्या चुकांवर पांघरून घालण हे एकप्रकारे त्यांना प्रोत्साहन देण्यासारखं असतं.त्यामुळे आपण त्यांच्यावर जेवढं प्रेम करतो तेवढंच काही बाबतीत कठोर होणं अपेक्षित आहे.आपण घरातील लहान मुलांशी त्यांच्या वर्तनावर कशा प्रकारे प्रतिक्रियीत होतो यावर त्यांच बारीक लक्ष असतं.लहान मुले ही घरात असणाऱ्या मोठ्या व्यक्ती वेगवेगळ्या घटकांवर कशा प्रतिक्रिया देतात याचा एकप्रकारे अभ्यासच करत असतात आणी त्यानुसार ते आपापल्या स्वभावात बदल करत असतात.त्यामुळे त्यांच्याशी योग्य बाबतीत प्रोत्साहनपर तर अयोग्य बाबतीत कठोर होणं अपेक्षित आहे; ज्या आधारावर ते आपल्या वर्तणुकीमध्ये बदल घडवत असतात.
घरातील मोठ्या व्यक्तीची ही एकप्रकारे जबाबदारीच आहे की आपण त्यांच्याशी संवाद साधत असताना आपल्या वर्तनातून ते आपल्याकडून नेमक काय शिकतात? याचा विचार होणे आपल्याकडूनअपेक्षित आहे एकप्रकारे आपल्या सर्वांची वर्तणूक ही त्यांच्यासाठीच आवश्यक आणि पोषक वातावरण तयार करते त्यामुळे आपण कोणत्या प्रसंगावर त्यांच्याशी कशा प्रकारे रिऍक्ट होतोय हे महत्वाच आहे........

0 Comments