अन्न पाणी निवारा ह्या मूलभूत गरजा मानल्या जातात.याचप्रमाणे आज मोबाईल ही सुद्धा मूलभूत गरज मानायला काय हरकत नाही.कारण आज बहुतांशी लोकांकडे मोबाईल आहेच.मग तो कसाही असो पण आजच्या जनतेचा जास्तीत जास्त कल हा स्मार्ट फोन्स कडे असल्याचा दिसून येतो.वेगवेगळ्या ब्रॅंडचे वेगवेगळे आणि आकर्षक फोन आज बाजारात उपलब्धही आहेत. या फोन्स मध्ये वेगवेगळे अँप्स ही आहेत काही इनबिल्ट तर काही आपण त्याच्या स्टोर मधून डाउनलोड करून घेऊ शकतो. अशा अँप्स पैकीच एक म्हणजे व्हाट्सप हे अँप बहुतांशी म्हणजे ९९.९९% लोकांच्या मोबाइलमध्ये आहेच आहे.याला कसल्याही जाहिरातीची आवश्यकता असेल अस मला वाटत नव्हतं कारण व्हाट्सएप खूप मोठं अँप आहे.याबद्दल माहिती नाही असे बोटावर मोजण्याइतपत लोकही सापडणार नाहीत.
परवा टी वी वर व्हाट्सएपची जाहिरात पहिली आणि सहजच वाटलं की यांना काय जाहिरातीची आवश्यकता? पण पूर्ण जाहिरात पाहिल्यास हेही लक्षात आलं की,जाहिरात करावी तर अशी जी सगळ्यांना अपील होईल. सदर जाहिरातीत अमृता सुभाष सारखी मुरब्बी अभिनेत्री खूप सुंदर पद्धतीने व्हाट्सएप काय आहे आणि नेमके काय काम करते, हे एक उत्तम संदेशवहनाचे साधन आहे हे योग्य पद्धतीने स्पष्टपणे आपल्या अभिनयाच्या माध्यमातून संदेशीत करत असताना दिसून येत आहे.
थोडक्यात काय तर ब्रँड मोठा असेल तर त्याला जाहिरातीची आवश्यकता नसते अस म्हणता येणार नाही पण आपण कीती लोकांपर्यंत कशा पद्धतीने पोहचू शकतो हे शिकण्याच एक उत्तम उदाहरण म्हणजे ही जाहिरात.